shri hospital aurangabad

रुग्णांसाठी सुचना

प्रसुतीसाठी नावनोंदणी पुर्व सुचना

 • नोंदणी न केलेला पेशंट प्रसुतीसाठी अँडमीट केला जाणार नाही. घरी बाळंतपणाचा प्रयत्न करुन आणल्यासही असा पेशंट अँडमीट करुन घेतला जाणार नाही.
 • प्रसुतीसाठी येतांना बरोबर फाईल,कागदपत्रे,वापराचे कपडे बरोबर आणावेत‌
 • बाळांतपणासाठी येतांना बरोबर जबाबदार पुरुष व्यक्ती असावी. नैसर्गिक मार्गातुन प्रसुती न होता सिझेरिअनचा निर्णय काही वेळा त्या परिस्थिती प्रमाणे घ्यावा लागतो. पेशंटच्या नातेवाईकांनी वेळेवर होकार न दिल्यास विलंब लागण्याची शक्यता असते.सिझेरिअन साठी वेळेवर होकार न दिल्यामुळे बाळाच्या जीवाला धोका उदभवतो. कधी‍ कधी एखादे बाळ विलंब लावता लहान मुलांच्या हाँस्पिटलमध्ये हलवावे लागते. उदा. बाळाने पोटात असतानाच शी करणे, बाळाचे ठोके प्रसुतीपुर्वी अनियमित होणे, पेशंटला जोर करता न आल्यामुळे आँपरेशन करावे लागणे
 • प्रसुतीनंतर किंवा आँपरेशन नंतर आपल्याला स्पेशन रुम हवी असॆल तर त्या प्रमाणे अँडमिट होतांना कळवा. रुम रिकामी असेल तर लगेचच आपणास दिली जाईल. रुम रिकामी नसल्यास, ती रिकामी होईपर्यत जनरल वार्डमध्ये रहावे लागेल. ठरवुन आँपरेशन करायचे असल्यास रुम देता येऊ शकते.
 • प्रसुतीनंतर ४८ तासात(दोन दिवसांच्या आत)पुर्वी घरी जायचे असल्यास सही करुन जाता येईल(अगेन्स्ट मेडिकल अँडव्हाईस) यामध्ये बाळ व आई यांच्या तब्येतीची जबाबदारी पेशंटची असेल‌
 • काही अपरीहार्य कारणामुळे डाँक्टर प्रसुतीसाठी उपलब्ध नसतील तर दुसरे डाँक्टर बोलवले जातील किंवा पेशंटला सोय म्हणुन दुसऱ्या हाँस्पिटलचा पर्याय दिला जाईल. दुसऱ्या हाँस्पिटलचा खर्च हा त्या हाँस्पिटलप्रमाणे असेल‌

अँडमिट पेशंट व नातेवाईकांसाठी
 • रुग्णाबरोबर दागिने,मौल्यवान वस्तु देऊ नयेत. कोणतीही मौल्यवान वस्तु किंवा सेलफोन गहाळ झाल्यास हाँस्पिटल जबाबदार असणार नाही.
 • स्त्रियांच्या वार्डमध्ये रात्रीच्या वेळी किंवा दिवसा पुरुष नातेवाईकास झोपण्याची परवानगी नाही. त्यांनी विश्रांती रुममध्ये थांबावे
 • प्रसुतीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णाबरोबर जबाबदार दोन व्यक्ती वाँर्डमध्ये थांबु शकतील. दोनपेक्षा जास्त नातेवाईक व्यक्तींनी वाँर्डमध्ये थांबु नये
 • प्रसुतीसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी येताना आवश्यक कागदपत्रे नसल्यास अँडमीट केले जाणार नाही
 • डिसचार्ज घेऊन हाँस्पिटलमधुन जाण्यापुर्वी आपला डिसचार्ज पेपर,रिपोर्ट्स मागुन घ्या व पुन्हा तपासणीस येण्याची तारीख विचारुन घ्या
 • काही वेळा नियमित उपचार चालु असताना सुद्धा काही गुंतागुंतीच्या समस्या उदभवल्यास(उदा.अतीरक्तदाब,झटके,अती रक्तस्त्राव,ह्र्द्य किंवा श्वसन संस्थेशी निगडीत आजार) रुग्णाला सुपर स्पेशालीटी हाँस्पिटल ला पाठवण्याची गरज पडु शकते. अशावेळी रुग्णाचे व नातेवाईकांचे सहकार्य अपेक्षीत आहे.

 

 

copyrights@2017 All Rights Reserved