shri hospital aurangabad

नवजात शिशुची काळजी

बेंबीत,नाकात व कानात तेल सोडु नये. डोळ्यात काजळ घालु नये. डोळ्यात दुध घालु नये.
बाळाची छाती(स्तन) पिळुन दूध काढु नये.
बाळ कमी वजनाचे किंवा अपु‍‍‍‍या दिवसाचे असल्यास त्याला दुध ओढणे अशक्य असल्याने डाँक्टराच्या सल्ला घ्यावा.
टाळुवर तेल सोडु नये.
दुध पाजण्याच्या अगोदर हात,भांडे,स्वच्छ धुवून घ्यावे.
डाँक्टराच्या सल्ल्याने कमी वजनाच्या बाळास गरम पाण्याने दररोज आंघोळ घालाव
बाळाच्या आंघोळीच्या वेळेस कुठल्याही बाईला माँलीश करावयास सांगु नये.
बाळास लसीकरण वेळेवर करणे.
पहिल्या १ ते २ वर्षात मुलांचे लघवीचे छिद्र बारीक असते त्याला जबरदस्तीने मागे ओढण्याचा प्रयत्न करु नये.
अंगावरचे दुध पहिल्या सहा महिन्यापर्यत पाजावे.आईला अंगावरचे दुध कमी येत असल्यास डाँक्टराच्या सल्लानुसार‌ पावडर किंवा गाईचे दुध सुरु करावे. बाटलीने दुध पाजणे शक्यतो टाळावे,वाटी चमच्याने दुध पाजणे जास्त हिताचे आह
आईचे दूध‍‍‍‍ आईचे दूध से सर्वॊत्तम असते. बाळाला आईच्या दुधात चिक असतो, तो चिक बाळाला पाजणे बाळंपणानंतरच्या सुरुवातीच्या पहिल्या एक दोन दिवसात आईच्या दुधात चिक असतो,तो चिक बाळाला पाजणे खुप फायद्याचे असते. आईचे दूध पाजल्याने बाळाच्या शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण होते व पोलिओ,घटसर्प,डांग्या खोकलाव इतर संसर्गजन्य आजारापासुन संर‌क्षण होण्यास मदत होते
 
जुलाब/उलटी झालेल्या बाळाची काळजी कशी घ्याल‌?
   
इलेक्ट्राँल(सलाईनचे) पाणी पाजावे. इलेक्ट्राँल घरात नसेल तर ग्लासभर पाण्यात मीठ,एक चमचा साखर घालुन पाजावे व नंतर डाँक्टराचा सल्ला घ्यावा, वरण भाताचे पाणी, सफरचंद,केळी, साबुदाणा खीर द्यावी.
 
तापात झटके अल्यास काय करावे?
 
झटके येत असतांना बाळाचे तोड एका कुशीवर वळवावे व कपडे सैल करावेत.
ताप असल्यास ताबडतोब संपुर्ण अंग गार पाण्याने पुसून काढावे व डाँक्टराचा सल्ला घ्यावा.
 
आहार‌
   
०‍..५ महिने
 फक्त आईचे दुध पाजावे. बाटलीने दूध पाजू नये. दुध पाजल्यानंतर ढेकर येई पर्यत उभे धरावे.
६..९ महिने
 बाळाला भरीव आहार द्यावा. उदा.: मूगडाळ..तांदळाची खिचडी, तांदळ व रव्याची खिर,
 हळुहळु खिचडी बरोबर पालेभाज्या देण्यास सुरूवात करावी. उकडलेले अंडे पहिल्यांदा आतील पिवळे बलक व नंतर पूर्ण अंडे बाळाला खाऊ घालावे. फळे : मोसंबी,केळी,चिक्कु,पपई,सफरचंद इ.

९..१२ महिने
आपल्या बाळाला घरात शिजवलेले अन्न स्वत: खाण्यास प्रोत्साहन द्यावे.

 

 

 

copyrights@2017 All Rights Reserved